Wednesday, February 27, 2013

How to Avoid Cataracts!



A cataract is a clouding that develops in the lens of the eye and blur our vision, causing nearsightedness (myopia) and decreasing our ability to detect the color blue. Left untreated, they may even cause full blindness. Many people develop cataracts in later ages, but there are ways to refrain from developing it, especially at an earlier age. Adhere to these tips and you may prevent a cataract ever forming on your lens!

Protect the eyes from the potential side effects of certain medications. Prolonged use of steroids, tranquilizers, and psoriasis medication may cause cataracts when taken in large doses over a long period of time.


Those suffering from diabetes should keep their blood sugar under control. This is because diabetics tend to develop cataracts faster and at an earlier age than other adults.


Protect your eyes from ultraviolet sun rays as these rays speed up the development of cataracts. Whenever out in the sun, wear sunglasses.


Studies have shown that antioxidant vitamins such as vitamin C, vitamin E and beta carotene slow the development of cataracts. Make sure your body doesn't lack any of these vitamins and if it does, take supplements.
If there is uncontrolled diabetes, injury to the eye, or visual symptoms of decreased reading vision, consult an ophthalmologist to evaluate the problem to help restore sight and prevent blindness. 
Foods like butter, oils (except olive oil) and salt, and increased fat consumption in general has been associated with a higher risk of developing cataracts. So, avoid using or limit the intake of such foods.
A diet rich in spinach, cruciferous vegetables (like broccoli), tomatoes, peppers, citrus fruits and melons help prevent cataracts.

Avoid exposure to heavy metals, particularly cadmium, copper, lead, iron and nickel as they may also increase cataract formation as these metals have been found in cataractous lenses.

Better to avoid smoking too.

Cataracts that occur due to the ageing process cannot be prevented as the ageing process itself cannot be prevented, but they can be delayed and fought against, so that you may not have to deal with them when you get older.

Saturday, February 9, 2013

सिंहस्थ



व्यर्थ गेला तुका ,व्यर्थ ज्ञानेश्वर
संतांचे पुकार, वांझ झाले
रस्तोरस्ती साठे, बैराग्यांचा ढीग
दंभ शिगोशीग, तुडुंबला
बँड वाजविती, सैंयामिया धून
गजांचे आसन, महंता‌सी
आले खड्ग हाती, नाचती गोसावी
वाट या पुसावी, अध्यात्माची
कोणी एक उभा, एका पायावरी
कोणास पथारी, कंटकांची
असे जपीतपी, प्रेक्षकांची आस
रुपयांची रास, पडे पुढे
जटा कौपिनांची, क्रीडा साहे जळ
त्यात हो तुंबळ, भाविकांची
क्रमांकात होता, गफलत काही
जुंपते लढाई, गोसव्यांची
साधू नाहतात, साधू जेवतात
साधू विष्ठतात, रस्त्यावरी
येथे येती ट्रक, तूप साखरेचे
टँकर दुधाचे, रिक्त तेथे
यांच्या लंगोटीला, झालर मोत्याची
चिलीम सोन्याची, त्याच्यापाशी
येथे शंभराला, लाभतो प्रवेश
तेथे लक्षाधिश, फक्त जातो
अशी झाली सारी, कौतुकाची मात
गांजाची आयात, टनावारी
तुज म्हणे ऐसे, मायेचे माइंद
त्यापाशी गोविंद, नाही नाही.

- कुसुमाग्रज

Sunday, January 27, 2013

चित्रगुप्ताची चोपडी



त्र्यंबकेश्वरीं कालसर्पयोगाचे नारायण-नागबळी विधी करणारे तोता भट आसन्नमरणावस्थेत होते, ते निधन पावले. पापपुण्याची झाडाझडती देण्यासाठी चित्रगुप्तासमोर उभे राहिले. चित्रगुप्त म्हणाला,"माझ्या वहीतील नोंदींप्रमाणे दिसते की तू नागबळी नावाचा विधी करायला भाग पाडून एक हजार नऊशे एकसष्ठ जणांना लुबाडण्याचे मुख्य पाप केले आहेस.म्हणून तुला तेव्हढे दिवस नरकवास भोगावा लागेल. अन्य लहान सहान पापे आहेतच."
"मी हे सगळे धर्मशास्त्रानुसार केले.ते पाप कसे असेल?"
"माझ्यासमोर खोटे बोलायचे नाही.मी चित्रगुप्त आहे.त्र्यंबकेश्वराला आलेले तुझे भोळसट, श्रद्धाळू गिर्‍हाईक नव्हे. कुंडलीतील राहू-केतू बिंदू जोडणार्‍या सरळ रेषेच्या एका बाजूला सगळे ग्रह पडले म्हणजे कालसर्पयोग होतो. तो त्या व्यक्तीला घातक असतो. असे तुम्ही सांगता ते श्रुति-स्मृति-पुरा्णोक्त आहे काय ? कुंडली तरी कोणत्या धर्मशास्त्रात आहे काय ? सांग पाहू. श्रद्धाळूंना फसवण्यासाठी तुम्हीच निर्माण केलेली ही सगळी बनवाबनवी आहे.त्यासाठी शास्त्राधार मुळीच नाही"
"पण मी तिरुपती बालाजी,अष्टविनायक,आदि अनेक तीर्थयात्रा केल्या आहेत. काशीला जाऊन पर्वकाळी शुभमुहूर्तावर गंगास्नान केले आहे.सत्यनारायणव्रत तर प्रतिवर्षी करत होतो. त्यामुळे शास्त्रवचनांनुसार माझ्या पापांचे क्षालन झाले असेलच."
"हे सगळे तुमच्या मनाच्या समजुतीसाठी. खोटेनाटे सांगून लोकांना फसवल्याचे मनात खात असते ना!त्यातून थोडी सुटका मिळवण्यासाठी करावयाचे हे भ्रामक उपाय आहेत.इकडे कर्मफलसिद्धान्त सांगायचा आणि तिकडे पापक्षालनाचे उपाय करायचे.काय ही विसंगती! किती ही आत्मवंचना !! तू अनेक गरिबांनासुद्धा लुबाडले आहेस.या पापातून सुटका नाही.नरकवास भोगावाच लागेल."
"पण तो चुकवण्याचा काहीतरी मार्ग असेलच ना?" तोता भट म्हणाला.
"तो निरर्थक,निरुपयोगी नागबळी विधी अनेकांना करायला लावून तू खूप संपत्ती गोळा केली आहेस.त्या सगळ्याची नोंद माझ्या चोपडीत आहे.पण तो पैसा राहिला घरी.इथे त्याचा काही उपयोग नाही.नियमाप्रमाणे नरकात जाणे अटळ आहे."
"या नरकवासाचे स्वरूप काय असते?"
" आता आलास सरळ! पाप केले आहेस हे पटले ना? या पापासाठी सर्पनरकभोग आहे.एका मोठ्या हौदात खूप साप ठेवले आहेत.तिथे तुला एकहजार नऊशे एकसष्ट दिवस कंठावे लागतील.ते गार गिळगिळीत साप तुझ्या अंगावर सतत सरपटत राहातील.तुझ्यासारखे अनेकजण तिथे अशा नरकयातना भोगत आहेत."
" तिथे स्नानसंध्येची तरी काही व्यवस्था असेल ना?"
"स्नानसंध्या? हा ! हा! हा! सकाळी आंघोळ,पूजा-अर्चा आटोपून कपाळावर गंधाचे किंवा कुंकुमाचे टिळे लावून वरवर शुचीर्भूत होऊन पुण्यकृत्य केल्यासारखे दाखवायचे.मग दिवसभर सावजे गाठून पापे करायला मोकळे! नरकात तसले काही नसते.खाणे-पिणे नसते.मरणही नसते. केवळ यातना भोगायच्या.तुझ्या सर्वांगावरून साप सतत फिरणार."
"पण माझ्या देहाचे दहन झाले आहे.शरीरच नाही तर साप अंगावरून कसे सरपटणार?"
"शाबास! थोडे थोडे तुझ्या ध्यानी येत आहे.खरे तर तुझा अजून मृत्यू झालेला नाही.तू मरणासन्न अवस्थेत मृत्युशय्येवर आहेस."
"मेलेलो नाहे? मग चित्रगुप्तासमोर उभा कसा?"
"कुठला चित्रगुप्त? अंतकाळी तुझा तुझ्याशीच चाललेला हा संवाद आहे.तुझी सदसद्विवेकबुद्धी म्हणजे मी,चित्रगुप्त.आयुष्यभरात तू जे काही पापपुण्य केलेस त्याच्या सचित्र नोंदी तुझ्या मेंदूच्या स्मृतिकेंद्रात आहेत.तीच माझी चोपडी.तू काय काय केलेस ते सगळे कुणा त्रयस्थाला कसे कळणार? आता मेंदूतील ती जीवनचित्रपटदृश्ये तुझ्या डोळ्यांपुढून वेगाने सरकत आहेत.भोळसट श्रद्धाळूंना लुबाडून तू पाप केले आहेस.त्याचे फळ म्हणून तुला नरकयातना भोगाव्या लागणार असे तुला मी,म्हणजे तुझी सदसद्विवेकबुद्धीच सांगत आहे."
"मी असे करायला नको होते.शिक्षकाची नोकरी होती.त्यात कुटुंबाचे भागले असते."
"हे तुझ्या बुद्धीला त्यावेळीही समजत होते.पण लोभ,मोह अशा मनोविकारांनी बुद्धीवर मात केली.पुढे या धंद्यात विनायास खूप प्राप्‍ती होऊ लागली.पैसा वाढल्यावर विषयोपभोग,रंगढंग सुचू लागले.अंतर्मनात टोचणी लागली होती.तिच्या शमनार्थ तीर्थयात्रा,जपजाप्य,सत्यनारायण व्रत असे उपाय केले. ते सगळे निरर्थक आहे हे बुद्धीला कळत होते पण भावनेला वळत नव्हते.अंतकाळी सगळे आठवलेच."
"मी अजून जिवंत आहे तर!"
"मनात तोच विचार चालला आहे वाटते ! जगण्याची आशा तुटत नाही का? पण आता मरण अटळ आहे.अगदी जवळ आले आहे.म्हणून आपले निधन झाले,अंत्यसंस्कार झाले असे भासले.आता नरकयातना भोगाव्या लागणार याची जाणीव झाली."
"मृत्यूनंतर नरकवास नसतो का?"
"मृत्यूनंतर काहीच नसते.हे पटवून देण्याचा मी अनेकदा प्रयत्‍न केला.पण उपयोग झाला नाही.प्रत्येक वेळी भावनेने बुद्धीवर मात केली. नरकातील यातना तसेच स्वर्गातील सुखे या गोष्टी मानसिक पातळीवर भोगायच्या असतात.आयुष्यातील सर्व घटनांचा पट मृत्यूपूर्वी काही काळ विद्युत् वेगाने दृष्टिपटलावरून सरकत असतो. ज्यांनी सत्कृत्ये केलेली असतात त्यांना सुख, समाधान, कृतकृत्यता वाटते.तसे आयुष्यभर त्यांना सुखसमाधान लाभतच असते.तेच स्वर्गसुख.
ज्यांनी दुष्कृत्ये केलेली असतात त्यांना ती आठवून मानसिक यातना होतात. हा नरकवास म्हणायचा. खरे तर हे अगदी अल्पकाळ असले तरी आपण वर्षांनुवर्षे नरकवास भोगतो आहोत असे वाटते.काळ सापेक्ष असतो.तसेच केल्या पापाचे शल्य नेणिवेच्या पातळीवर आयुषभर टोचतच असते."
"मग मी आता काय करू?"
"आता तुझ्याहाती काही नाही.
श्वासोच्छ्वास थांबेपर्यंत शारीरिक आणि मानसिक पातळीवर जे घडत राहील ते सोसायचे. दुसरे काय?"
.......................................................................................प्रा..ना.वालावलकर

Thursday, January 17, 2013

Nice to read and to think also.....


Home truths on Career Wives----Girls should read, but Boys MUST read... Chetan Bhagat

Recently, I saw the recently released movie, Cocktail. The plot revolves ...around a philanderer hero who has to make the tough choice between two hot women. The uber-modern movie was set in London. The characters drank, danced in nightclubs and had one-night stands with aplomb. They worked in new-age aspirational jobs like glamour photography, graphic art and software design. And yet, the guy eventually chooses the girl who cooks home food, dresses conservatively, wins his mother's approval and is happy to be the ideal Indian wife. In fact, even the rejected girl, a free-spirited, independent woman agrees to change herself. To get the guy, she is happy to cook and change her lifestyle to match that of the ideal Indian wife.

While the movie was fun, such depictions disturb me a little. When successful, strong women are portrayed as finding salvation in making dal and roti for their husbands, one wonders what kind of India we are presenting to our little girls.

Really, is that what a woman's life is all about — to make hot phulkas? Of course, i shouldn't be so bothered, many would say. It is a Bollywood movie. The commercial pressure to present a palatable story is real. Above all, the makers have a right to tell the narrative they want.

Yet, when our most modern and forward cinema sinks into regressive territory, it is unfair to our women. It is also depressing because deep down we know such attitudes exist. Many Indian men, even the educated ones, have two distinct profiles of women — the girlfriend material and the wife material. One you party with, the other you take home. The prejudice against non-traditional women who assert themselves is strong.

Let us look at another part of the world. Yahoo, a leading tech firm and a Fortune 500 company, recently hired a new woman CEO, Marissa Mayer. What's more, she was six months pregnant when she was hired, a fact she did not hide in her interviews.

Marissa will take some time off after childbirth and will be back at work later. She can manage both. There is something to celebrate about that. Marissa is a role model for women and even men.

I'd like Indian men to have an open mind about choosing their life partners and revise their 'ideal woman' criteria. Having a traditional wife who cooks, cleans and is submissive might be nice. However, choosing a capable, independent and career-oriented woman can also bring enormous benefits. For instance, one, a man who marries a career woman gets a partner to discuss his own career with. A working woman may be able to relate better to organizational issues than a housewife. A spouse who understands office politics and can give you good advice can be an asset. Two, a working woman diversifies the family income streams. In the era of expensive apartments and frequent lay-offs, a working spouse can help you afford a decent house and feel more secure about finances. Three, a working woman is better exposed to the world. She brings back knowledge and information that can be useful to the family. Whether it's the latest deals or the best mutual fund to invest in, or even new holiday destinations, a working woman can add to the quality of life. Four, the children of a working woman learn to be more independent and will do better than mollycoddled children. Five, working women often find some fulfillment in their jobs, apart from home. Hence, they may have better life satisfaction, and feel less dependent on the man. This in turn can lead to more harmony. Of course, all these benefits accrue if men are able to keep their massive, fragile egos aside and see women as equals.

Sure, there are drawbacks also in being with working women. But the modern age that we are in, the phulka-making bride may come at a cost of missing out on other qualities. Please bear that in mind before you judge women based on their clothes, interest in the kitchen or the confidence in their voice.

My mother worked for 40 years. My wife is the COO at an international bank. It makes me proud. She doesn't make phulkas for me. We outsource that work to our help, and it doesn't really bother me. If my wife had spent her life in the kitchen, it would have bothered me more.

Please choose your partner carefully. Don't just tolerate, but accept and even celebrate our successful women. They take our homes ahead and our country forward. We may have less hot phulkas, but we will have a better nation. 

Chetan Bhagat 

Wednesday, January 9, 2013

Attitude is Everything


An old man lived alone in Minnesota. He wanted to spade his potato garden, but it was very hard work. His only son, who would have helped him, was in prison. The old man wrote a letter to his son and mentioned his situation:


Dear Son,
I am feeling pretty bad because it looks like I won’t be able to plant my potato garden this year. I hate to miss doing the garden because your mother always loved planting time. I’m just getting too old to be digging up a garden plot. If you were here, all my troubles would be over. I know you would dig the plot for me, if you weren’t in prison.
Love,
Dad
Shortly, the old man received this telegram:
‘For Heaven’s sake, Dad, don’t dig up the garden!! That’s where I buried the GUNS!!’
At 4 a.m. the next morning, a dozen FBI agents and local police officers showed up and dug up the entire garden without finding any guns.
Confused, the old man wrote another note to his son telling him what had happened, and asked him what to do next.
His son’s reply was:
‘Go ahead and plant your potatoes, Dad. It’s the best I could do for you, from here.’
—————–
MORAL:-

NO MATTER WHERE YOU ARE IN THE WORLD, IF YOU HAVE DECIDED TO DO SOMETHING DEEP FROM YOUR HEART, YOU CAN DO IT. IT IS THE THOUGHT THAT MATTERS, NOT WHERE YOU ARE OR WHERE THE PERSON IS.

Tuesday, November 13, 2012

Think Higher

Subscribe Us For Lovely & Innovative Mails... Love Ever Grroups....

शरीरश्रमास पर्याय नाही


प्रशांत दीक्षित -prashant.dixit@expressindia.com
Published: Tuesday, November 13, 2012
आजचा काळ बुद्धीचा आहे असे अभिमानाने सांगितले जाते. बौद्धिक श्रम हे शरीरश्रमापेक्षा वरचे मानले जातात. आरामदायी आयुष्य ही बुद्धीची करामत आहे व आराम प्रत्येकाला हवाच असतो. रेल्वे, विमान, दूरध्वनी अशा उपयुक्त शास्त्रीय शोधांबरोबरच बँका, विमा, शेअर बाजार अशा व्यवस्थाही बुद्धीने निर्माण केल्या. तथापि, बुद्धीला ही शक्ती प्राप्त झाली ती शरीराच्या विशिष्ट घडणीमुळे. उत्क्रांतीतून ही घडण होत गेली. मात्र बुद्धीच्या विकासामध्ये मेंदूबरोबर शरीरातील अन्य अवयवांनाही महत्त्व असते व या अवयवांना श्रमांचा खुराक लागतो याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी, जीवनात मधुमेह, कर्करोग, नैराश्य अशा आजारांनी कायमचे निवासस्थान केले. पैसा मिळत असला तरी स्वास्थ्य दुरावत आहे.
डॅनियल लीबरमॅन हे उत्क्रांतिशास्त्राचे अभ्यासक. शरीराची घडण कशी होत गेली हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय. माणसाचे डोके व पाय यांची रचना कशी होत गेली व ते परस्परांना पूरक कसे आहेत याचे उत्कृष्ट विवेचन ते करतात. कलेच्या प्रांतातील प्रतिभा आपल्याला माहीत असते, शास्त्रातील प्रतिभा आपल्या लक्षात येत नाही. शरीराच्या घडणीचा इतिहास उत्क्रांतिशास्त्राच्या अंगाने लीबरमॅन उलगडून सांगतात तेव्हा शास्त्रातील प्रतिभा आपल्या लक्षात येते.
शरीराची रचना व शरीरश्रम यांचा घट्ट परस्परसंबंध आहे. व्यायाम करायला हवा असे सर्वजण सांगतात. पण उत्क्रांतीचा संदर्भ देऊन लीबरमॅन व्यायामाची शास्त्रीय बैठक प्रचंड व्यापक करतात. शरीरश्रम सुखाच्या विरोधात नाहीत तर सुखाकडे घेऊन जाणारे आहेत. शरीरश्रमात धावणे व चालणे अत्यावश्यक आहे. किंबहुना धावण्यामुळेच आपली उत्क्रांती झाली व आपण मेंदू कार्यक्षम करू शकलो असे म्हणता येईल. त्यातही लांबवर जलद चालणे हे अधिक उपयोगी.
याचा वेध उत्क्रांतीत घेता येतो. सुमारे ६० लाख वर्षांपूर्वी माणूस द्विपाद झाला व त्याने चालण्यास सुरुवात केली. त्या वेळी शीतलहर आली होती. त्यामुळे जंगले कमी झाली. माणूस तेव्हा शाकाहारी होता. जंगले कमी झाल्यामुळे त्याला अन्न शोधण्यासाठी भटकंती करावी लागली व म्हणून तो दोन पायांवर उभा राहिला. चालता आल्यामुळे अन्न शोधण्याचा त्याचा पल्ला वाढला.
अन्न सुलभतेने मिळू लागले. काही लाख वर्षांनी दुसरी शीतलहर आली. या वेळी निसर्गात बऱ्याच उलथापालथी झाल्या आणि त्याला प्रतिसाद देताना माणसाने चिंपांझीपेक्षा वेगळा मार्ग पत्करला. माणूस उच्च दर्जाच्या अन्नाच्या शोधात निघाला. जगण्यासाठी त्याला दर्जेदार अन्न हवे होते व जगण्याचे मार्ग शोधण्यासाठी मेंदू कार्यक्षम करायचा होता. म्हणून तो शिकार करू लागला. अन्य प्राण्यांच्या तुलनेत तो दुबळा होता. तरीही तो उत्तम शिकार करू लागला. हे कसे शक्य झाले?
माणसाला लागलेला हत्यारांचा शोध असे याचे उत्तर दिले जाते. हत्यारांमुळे त्याने प्रचंड झेप घेतली हे खरे. पण माणूस चिंपांझीपासून वेगळा झाला साधारण साठ लाख वर्षांपूर्वी आणि त्याला हत्यारांचा शोध लागला साधारण पंचवीस लाख वर्षांपूर्वी.
मग या मधल्या ३०-३५लाख वर्षांच्या काळात माणूस शिकार कशी करीत होता, या प्रश्नावर लीबरमॅन काम करू लागले व त्यांना उत्तर सापडले ते माणसाच्या धावण्याच्या कौशल्यामध्ये. साध्या टोकदार बांबूने माणूस शिकार करू लागला, कारण लांब पल्ल्याची धाव त्याने विकसित केली. अन्य प्राणी त्याच्यापेक्षा शक्तीत सरस होते, पण धावेत त्यांना दमविण्यात माणूस सरस होता. प्राणी एकावेळी लांब उडी टाकतो वा धावतो. पण तो सतत धावू शकत नाही. उलट माणूस कित्येक तास धावू शकतो. प्राण्याला सातत्याने लांब उडय़ा टाकायला लावल्या की तो दमतो. त्याचे शरीर त्याला साथ देत नाही. प्राण्यांना धावायला लावून ते दमले की त्यांची शिकार करण्यास माणसाने सुरुवात केली.
लीबरमॅन यांनी शिकारी माणसांची जीवनशैली मांडली आहे. त्या वेळी पुरुष रोज १२ ते १४ किलोमीटर धावत वा चालत होता. याशिवाय खणणे, झाडावर चढणे अशा अनेक शारीरिक कृती करीत होता. बायकाही रोज ९ किलोमीटर चालत. त्या मुलांना खांद्यावर घेऊन चालत. शिकार पाठीवर मारून नेण्याची कला माणसाला अवगत होती. माणसाची खांद्याखालील सर्व रचना, त्याचे कान, डोळे ही धावण्याच्या जीवनशैलीला अनुरूप अशी विकसित होत गेली. धावताना तोल राखणे हे सर्वात महत्त्वाचे होते. माणसाची कानातील रचना याबाबत वैशिष्टय़पूर्ण आहे. याच वेळी माणसाला परस्पर सहकार्य, माहिती घेणे व तिचे वाटप करणे या गोष्टींचे महत्त्व कळत गेले. त्यातून भाषा निर्माण झाली. ही संस्कृतीची सुरुवात होती. हे बौद्धिक उद्योग करण्यासाठी मेंदू वाढत गेला. शारीरिक दुबळेपणाची भर माणसाने दोन प्रकारे भरून काढली. त्याने शरीराची सहनशक्ती कित्येक पटीत वाढविली व तो लांब पल्ल्याची धाव घेऊ लागला आणि मेंदूच्या वाढीला त्याने प्राधान्य दिले.
थोडक्यात, गेली वीस लाख वर्षे आपण उत्तम लांब पल्ल्याचे अ‍ॅथलीट आहोत. पण औद्योगिक क्रांतीपासून आपण शरीरश्रम कमी करण्याकडे अधिक लक्ष दिले. गेल्या पन्नास वर्षांत तर ते खूपच कमी झाले. लीबरमॅन यांनी त्याचेही गणित मांडले आहे.
शिकार करणारा माणूस व आजचा माणूस यांच्या खाण्याच्या प्रमाणात फार फरक पडलेला नाही. पण शरीरश्रमात फार मोठा फरक पडलेला आहे. केवळ शहरी नव्हे तर ग्रामीण भागांतील माणसाचे शरीरश्रम जवळजवळ थांबले आहेत. शिकारी माणसाचे शारीरिक हालचालींचे प्रमाण १.८ टक्के होते, आज ते १.३ टक्क्यांवर आले. तरीही माणूस आज दमतो तो श्रमाने नव्हे, तर अर्थहीन निष्क्रिय जीवनशैलीमुळे. त्याला पैसा मिळतो, पण शरीराला श्रम मिळत नाहीत. मग तेथे आजारांचा शिरकाव होतो.
आजारांचे मुख्य कारण शरीरातील ऊर्जेचे असंतुलन हे आहे, असे लीबरमॅन सांगतात. शरीरश्रम केले तर हे संतुलन राहते व आजार येत नाहीत. भरपूर चालण्याने हृदय, यकृत, किडनी यांची कार्यक्षमता लक्षणीय सुधारते. त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. मेंदू हा अत्यंत खर्चिक अवयव आहे.
आपण निष्क्रिय असतो तेव्हाही मेंदू २२ टक्के ऊर्जा खात असतो. अन्य कुठल्याच अवयवाला इतकी ऊर्जा लागत नाही. मेंदूला ही ऊर्जा पुरविण्याचे काम मुख्यत: हृदय व पचनसंस्थेचे असते. लांबवर चालण्याने ती सुधारते. संस्कृती बहरण्यासाठी मेंदू वाढावा लागतो, पण त्या वाढीसाठी शरीराची तंदुरुस्ती अत्यावश्यक असते हे लक्षात येत नाही. माणसाला आराम हवाहवासा वाटला तरी शरीराला श्रम अत्यावश्यक असतात. लीबरमॅन तर म्हणतात की श्रम हेच माणसाचे उत्तम औषध आहे. डॉक्टरांकडून मिळणारी औषधे ही लक्षणे कमी करतात, पण रोग हटत नाही. आज औषधांमुळे माणसाचे आयुष्य वाढले आहे. परंतु रोगांचे प्रमाण कमी झालेले नाही. या असंख्य रोगांचे मूळ शरीरश्रमाला नाकारणाऱ्या भांडवलशाही जीवनपद्धतीत कसे आहे याचे कित्येक दाखले लीबरमॅन देतात. या समस्येत आणखीही गुंतागुंत आहे. शरीरश्रम पूर्वी सहज होते. आता व्यायामासाठी वेळ व भरपूर पैसे लागतात.
व्यायामाच्या सुविधा व त्यासाठी वेळ हे दोन्ही फक्त श्रीमंतांकडे असतात. गरीब व मध्यमवर्गाकडे पैसा नसतो आणि नोकरीला जाण्या-येण्यात त्याचा खूप वेळ खर्च होतो. तो दिवसभर कशात तरी गुंतलेला असला तरी त्याच्या शरीराला श्रम झालेले नसतात. वीस लाख वर्षांची श्रमाची सवय भिनल्यामुळे शरीर तर श्रमासाठी आसुसलेले असते. आजही रोज आठ-दहा किलोमीटर चालण्याची क्षमता शरीरात आहे. शरीराची सर्व इंद्रिये श्रमातूनच विकसित झाली आहेत.
श्रीमंत पैसे देऊन जिममध्ये हे श्रम विकत घेतात. गरिबांना ते परवडत नाही. तो गरीब असला तरी अगदी दोनशे वर्षांपूर्वी राजेरजवाडे जितके श्रम करीत तितकेही करण्याची वेळ त्याच्यावर सध्या येत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यात भर म्हणजे दर्जेदार, उत्तम अन्न महाग आहे; तर जंक फूड स्वस्त आहे. भारतात गरिबी आहे व श्रमाला वाव देणारी जीवनशैली आपण हद्दपार केली आहे. यामुळे कॅन्सर, हृदयविकार, मधुमेह, नैराश्य अशा आजारांचा फटका पाश्चात्त्यांपेक्षा आपल्याला अधिक बसणार आहे.
यावर उपाय एकच. भरपूर चालणे व मुद्दाम शोधून काढून शरीरश्रम करणे. यातही बूट न घालता चालणे अधिक उत्तम. लीबरमॅन यांनी तर 'बेअरफूट वॉकिंग' ही चळवळच सुरू केली. त्याला प्रतिसादही उत्तम मिळतो. जिथे जिथे शरीरश्रमाचा पर्याय मिळेल तेथे तो मुद्दाम निवडावा. किमान पाच किलोमीटर तरी चालावे आणि पौष्टिक, सकस अन्नाची त्याला जोड द्यावी. तुम्ही काय खाता यापेक्षा तुम्ही किती श्रम करता हे अधिक महत्त्वाचे आहे. कारण अन्न पचविण्याची ताकद श्रमातून मिळते. सध्या लोक अन्नाबद्दल जितके चिकित्सक आहेत तितके श्रमाबद्दल नाहीत. अन्नापेक्षा सुखकर आरामदायी यांत्रिक जीवनशैलीचा धोका अधिक आहे असे लीबरमॅन ठामपणे सांगतात.
शरीरश्रम किती आवश्यक असतात हे आणखी एका अभ्यासावरून लक्षात येईल.
हार्वर्डमध्ये शिकत असताना कोणत्या ना कोणत्या मैदानी क्रीडाप्रकारात मनापासून रस घेणाऱ्या साडेपाचशे विद्यार्थ्यांची तुलना बौद्धिक, बैठे काम करणाऱ्या त्यांच्याच वयाच्या अन्य विद्यार्थ्यांशी करण्यात आली. कित्येक वर्षे सातत्याने दोन्ही गटांचे निरीक्षण करण्यात आले. दुसरा गट खेळणारा नसला तरी अत्यंत काटेकोर जगणारा, व्यसनांपासून अलिप्त राहणारा असा होता. तरीही या गटापेक्षा खेळण्यात रस घेणाऱ्या गटांचे आयुर्मान वीस टक्क्यांनी अधिक आढळले.
मुख्य म्हणजे वृद्धपणात येणाऱ्या अडचणी खेळणाऱ्यांच्या गटात पन्नास टक्क्यांनी कमी आढळल्या. दोन निरोगी गटातील ही तुलना शरीरश्रमाचे महत्त्व ठसठशीतपणे दाखविते. महात्मा गांधींनी हे सर्व वाचलेले नव्हते. पण प्रयोगशील गांधींनी रोजच्या एकादश व्रतात शरीरश्रमाचा समावेश केला होता. अफाट राजकीय व सामाजिक काम करीत असतानाही रोजचे शरीरश्रम त्यांनी अगदी शेवटच्या दिवसापर्यंत टाळले नाहीत.
महात्माजींच्या आधी हजारो वर्षे उपनिषदकारांनी, 'चरैवेति' म्हणजे चालणे, हा जीवनाचा महामंत्र असल्याचे प्रतिपादन केले होते. ऋषींच्या अनुभवजन्य ज्ञानाला लीबरमॅन यांच्यामुळे उत्क्रांतिशास्त्राची जोड मिळाली आहे. चालण्याला, शरीरश्रमाला वाव मिळेल असा दिनक्रम आखणे कठीण असले तरी त्याला पर्याय नाही. उत्क्रांतीचा वीस लाख वर्षांचा हा वारसा आपण टाकला तर आजारी पडण्याशिवाय गत्यंतर नाही.