Monday, December 19, 2011

समाजाचे सोडा, मनाचे ऐका


जर तुम्ही उच्च व्यावसायिक किंवा शहरातील प्रतिष्ठित कुटुंबातील असाल तर तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होते? बहुधा बिछान्यातून उठून ड्रॉइंग रूममध्ये गेल्यानंतर तुमची मोलकरीण गरमागरम चहा किंवा कॉफीच्या कपाबरोबर त्या दिवशीची वृत्तपत्रे घेऊन हजर होत असेल. त्यानंतर तुम्ही स्पोर्ट्स किट घालून एखाद्या लॉन किंवा क्लब किंवा पब्लिक पार्कमध्ये जॉगिंगसाठी जात असाल. आमच्यापैकी बहुतेक जणांच...्या दिवसाची सुरुवात अशाच प्रकारे होते. मात्र बंगळुरूमध्ये राहणार्‍या तीन जणांच्या दिवसाची सुरुवात पहाटे चार वाजता होते. ते दररोज कमीत कमी दहा किलोमीटर सायकल चालवतात. त्यांच्यापैकी एक जण चार्टर्ड अकाउंटंट आहे, एक जण ऑक्सफर्ड कॉलेजमध्ये बायोकेमिस्ट्रीचा मास्टर डिग्री कोर्स करतो, तर तिसरा अँमेफिस सॉफ्टवेअर कंपनीत ट्रांझेक्शन प्रोसेसिंग ऑफिसर आहे. हे तिघेही एकमेकांना ओळखत नाहीत. ते सकाळी जवळपास एकाच वेळी उठतात, आपल्या सायकली घेतात आणि दररोज किमान 200 ते 300 घरी जातात. या तिघांचेही असे मत आहे की, ही सायकलस्वारी त्यांना स्लीम- ट्रीम ठेवते आणि दिवसभराची स्फूर्ती देते. आपल्याबद्दल समाज काय म्हणेल याची पर्वा न करता ते हे काम दररोज करतात. या हायटेक शहरात ते तिघेही पेपरबॉय आहेत. त्यातून होणार्‍या कमाईचा ते विचारच करीत नाहीत. मथितार्थ इतकाच की, आपल्या जीवनात जे चांगले वाटते तेच केले पाहिजे.आपल्या व्हिजिटिंग कार्डवर लिहिलेली उपाधी पाहून समाज काय म्हणेल याची पर्वा न करता! व्हिजिटिंग कार्ड ओळखीसाठी असतात, व्यक्तीच्या चरित्र निर्धारणासाठी नाही!

No comments:

Post a Comment