आपल्या पाचही विद्यानिकेतनातील मुले भारतातल्या अनेक शहरात विखुरलेले आहेत तर काही आपापल्या गावाजवळ किंवा गावात वा जिल्ह्यात काम करत आहेत. काही मुले निरनिराळ्या देशात काम करीत आहेत. एकाच गावात किंवा त्या त्या परिसरात किंवा त्या देशात राहत असुनही त्यांच्या गाठी भेटी होत नसल्याने ओळखी पण होत नाहीत परंतू एकदा की ती व्यक्ती विद्यनिकेतनातून शिकून गेलेली होती असं कळलं, आणि मग ती व्यक्ती कोणत्याही गावातील विद्यानिकेतनातून शिकलेली असो त्यांच्यामध्ये लागलीच प्रेमाचा बंध निर्माण होतो हे मी प्रत्येक्ष अनभवलं आहे. हे तुम्ही पण अनुभवलं असेल याची मला पक्की खात्री आहे. केवळं ते एकत्र येण्याची गरज आहे.
तर यावरून मला असं वाटायला लागलं की प्रत्येक शहराचं, त्या त्या परिसराचं किंवा देशाचं विद्यानिकेतनचं एक, एक चॅप्टर असावं आणि सर्व चॅप्टर्स मिळून एक कॉनफिडरेशन असावं त्या त्या चॅप्टर्सनी वर्षातून दोनदा वा किमान एकदा तरी गेट-टू-गेदर करावं आणि कॉनफीडरेशननं वर्षातून एकदा भेटावं. याचा फायदा असा होईल की त्यांच्या कुटुंबांच्या ओळखी होतील, काही मदत लागल्यास ती त्यांना मिळेल, कोणी नवीन ठिकाणी बदलून किंवा नविन नोकरीस आला तर त्याला इन्संट (तात्काळ) मदत मिळू शकेल. विद्यानिकेतनातून नविनच शिकून आलेले असतील तर त्यांना मार्गदर्शन मिळेल आणि मुख्य म्हणजे परस्परांना आधार वाटेल. याशिवाय बरेच फायदे असतील... कशी वाटते कल्पना?
No comments:
Post a Comment