Sunday, October 23, 2011

मित्रांनो,
      आजपासून या वर्षीची दिवाळी सुरु झाली. आपल्या दैनंदिन जीवनात अनेक अडचणी आल्या असतील बरेच मनस्ताप सोसावे लागले असतील. पण ह्या सर्वांची गोळाबोरीज केव्हा तरी केलीच पाहिजे ना....? तो दिवस  आजपासून सुरू झाला. आपण भाग्यवान मानू या स्वतःला की या अनंत काळात आपण जन्मलो, ब-या वाईटाचा अनुभव घेतला, किती तरी व्यक्ती प्रवृत्तींचा अनुभव आला. हा अनुभव आपली पुंजीच आहे. जेव्हा जीवनाचा खेळ खेळायला घेतला तेव्हा मित्रांनो हारजीत तर आलीच ना ..? प्रत्येक वेळी आपण जिंकुच, आपल्यालाच यश मिळेल असे तर होत नाही ना...? म्हणून खेळ सोडून द्यायचा..? नाही ना..तसा तो देताही येत नसतो..., आपली इच्छा नसली तरी... तेव्हा .. आलेले अपयश हा अनुभव आणि प्राप्त यश हे भांडवल मानून, पुढे सरसावून.. पुन्हा खेळायला सुरूवात करू या ..तशा व्यापारी पेढ्याही असा हिशेब मांडतात, आपण जीवनाच्या व्यापाराची गोळाबेरीज करू या.. त्याचीही सुरूवात आज झाली आहे.. दिवाळीचा पर्यायी शब्द उत्साह सुद्धा आहे....  आपणा सर्वांना दिवळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा...पुढच्या खेळासाठी..... नवी उभारी, नव्या उत्साहासाठी ....!!

No comments:

Post a Comment