Saturday, October 20, 2012

बाप्पा भेटला


परवा भेटला बाप्पाजरा वैतागलेला वाटला
                                                                  "दोन क्षण दम खातो", म्हणून माझ्या घरी टेकला
                                                  
                                                     "उंदीर कुठे पार्क करूलॉट नाही सापडला"
मी म्हटले "सोडून देआराम करू दे त्याला"
"तू पण ना देवाकुठल्या जगात राहतोस?
मर्सिडीजच्या जमान्यात सुद्धा उंदरावरून फिरतोस?"
"मर्सिडीज नाहीनिदान nano तरी घेऊन टाक
तमाम देव मंडळींमध्ये थोडा भाव खाऊन टाक"
"इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो
भक्तांना खुश करेपर्यंत खूप खूप दमतो"
"काय करू आता माझ्याने manage होत नाही
पूर्वीसारखी थोडक्यात माणसे खुशही होत नाहीत"
"immigration च्या requestsने system झालीये hang
तरीदेखील संपत नाही भक्तांची रांग"
"चार-आठ आणे देऊन काय काय मागतात
माझ्याकडच्या filesनुसत्या वाढतच राहतात"
"माझं ऐक तू कर थोडं थोडं delegation
management च्याtheory मध्ये मिळेल तुला solution"
"M.B.A. चे फंडे कधी शिकला नाहीस का रे?
Delegation of Authority कधी ऐकलंच नाहीस का रे?"
"असं कर बाप्पा एक Call Center टाक
तुझ्या साऱ्या दूतांना एक-एकregion देऊन टाक"
"बसल्याजागी कामं होतीलतुझी धावपळ नको
परत जाऊन कुणालादमलो म्हणायला नको"
माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्पा खुश झाला
"एक वर देतो बक्षीसमाग हवं ते म्हणाला"
"CEO ची position, Townhouse ची ownership
immigration देखील होईल झटपटमग duel citizenship"
मी हसलो उगाच, "म्हटलं खरंच देशील का सांग?"
अरे मागून तर बघथोडी देणार आहे टांग?
"पारिजातकाच्या सड्यामध्ये हरवलेलं अंगण हवं
सोडून जाता येणार नाहीअसं एक तरी बंधन हवं"
"हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव
प्रत्येकाच्या मनात थोडा मायेचा शिडकाव"
"देशील आणून मला माझी हरवलेली नाती?
नेशील मला परत जिथे आहे माझी माती?"
"इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं
आई-बापाचं कधीही  फिटणारं देणं?"
"कर्कश्श वाटला तरी हवा ढोल-ताशांचा गर्जार
भांडणारा असला तरी चालेलपण हवा आहे शेजार"
"यंत्रवत होत चाललेल्या माणसाला थोडं आयुष्याचं भान
देशील का रे देवायातलं एक तरी दान?"
"तथास्तुम्हणाला नाहीबाप्पा नुसता सोंडेमागून हसला सारं हाताबाहेर गेलंय पोरा, "सुखी रहा"म्हणाला......

No comments:

Post a Comment