युरोपातील Large Hadron Collider प्रयोगाद्वारे
हिग्ग'ज बोसॉन नावाचा कण शोधण्यात शात्रज्ञाना यश आले आहे. सर्व जड पदार्थांना वस्तुमान हा गुणधर्म असण्याला बोसॉनच कारण आहे असा हिग्ग चा सिद्धांत आहे. या मूलभूत कणास "देव कण" अशीही संज्ञा वापरली जात आहे. हिंदू धर्मात हे विश्व ईश्वराने बनवले असून तो सर्व चरा चरात वसतो असे सांगितले आहे. त्यामुळे हा हिग्ग'ज बोसॉन ( देव कण ) सापडला म्हणजेच देव सापडला असा काही भाबड्या लोकांचा समज झाला आहे.
आता एक नवीन देव सापडला म्हणजे त्याची पूजा, आरती करणे आलेच !
म्हणून या नवीन "बोसॉन देवाची" हि आरती रचली आहे. अर्थात हे एक विडंबन काव्य आहे हे सूद्य्नास सांगणे
नलगे !
आरती 'हिग्ज-बोसॉन'ची
जय देव जय देव, जय 'बोसॉन' देवा,
अगाध महिमा तुमचा कैसा वर्णावा || जय देव, जय देव || धृ||
महास्फोटाने* हे विश्व जन्मले,
तत्क्षणी अवकाशे** तया व्यापिले|
विखुरती अगणित शक्तीचे कण,
कालचक्रही मग झाले उत्पन्न || जय देव, जय देव ||१||
संचरती स्वैरभरे शक्तीचे कण,
दिधले काहीना हो तुम्ही वस्तुमान|
साकारण्या जड-सृष्टी न लागे क्षण,
अवतरले तयासवे गुरुत्वाकर्षण || जय देव, जय देंव||२||
बनती ग्रह-तारे, अन् बनला दिनकर ,
अवनीवर जीव-सृष्टी घेई आकार |
उद्भवती अपरिमित जंतू नी जीव,
अवतरे तद्नंतर प्राणी-मानव || जय देव, जय देव||३||
मानव करी ऐशा संतत विचारा ,
निर्मियला कवणे हा विश्व-पसारा|
कैसे त्याचे रूप?, वसे तो कोठे??
करी तर्क, मांडी सिद्धांत मोठे || जय देव, जय देव ||४||
म्हणती शास्त्रज्ञ ज्या 'हिग्ज-बोसॉन,'
तोची वस्तुमानासाठी कारण|
बनविला 'कोलायडर,' मोठा हद्रोन***
दृग्गोचर होई मग तो "ईश्वर -कण" || जय देव, जय देव ||५||
जय देव जय देव, जय 'बोसॉन' देवा,
अगाध महिमा तुमचा कैसा वर्णावा || जय देव, जय देव || धृ||
महास्फोटाने* हे विश्व जन्मले,
तत्क्षणी अवकाशे** तया व्यापिले|
विखुरती अगणित शक्तीचे कण,
कालचक्रही मग झाले उत्पन्न || जय देव, जय देव ||१||
संचरती स्वैरभरे शक्तीचे कण,
दिधले काहीना हो तुम्ही वस्तुमान|
साकारण्या जड-सृष्टी न लागे क्षण,
अवतरले तयासवे गुरुत्वाकर्षण || जय देव, जय देंव||२||
बनती ग्रह-तारे, अन् बनला दिनकर ,
अवनीवर जीव-सृष्टी घेई आकार |
उद्भवती अपरिमित जंतू नी जीव,
अवतरे तद्नंतर प्राणी-मानव || जय देव, जय देव||३||
मानव करी ऐशा संतत विचारा ,
निर्मियला कवणे हा विश्व-पसारा|
कैसे त्याचे रूप?, वसे तो कोठे??
करी तर्क, मांडी सिद्धांत मोठे || जय देव, जय देव ||४||
म्हणती शास्त्रज्ञ ज्या 'हिग्ज-बोसॉन,'
तोची वस्तुमानासाठी कारण|
बनविला 'कोलायडर,' मोठा हद्रोन***
दृग्गोचर होई मग तो "ईश्वर -कण" || जय देव, जय देव ||५||
जन म्हणती कलियुगी घडे चमत्कार,
प्रकटे अवनीवर साक्षात ईश्वर !
महिमा ज्याचा मानिती शात्रज्ञ थोर ,
कैसे वर्णू त्या मी क्षुद्र पामर II जय देव, जय देव ||६ ||
जय देव जय देव, जय 'बोसॉन' देवा,
अगाध महिमा तुमचा कैसा वर्णावा, जय देव, जय देव ||
अगाध महिमा तुमचा कैसा वर्णावा, जय देव, जय देव ||
देविदास दत्तात्रय देशपांडे, पुणे.
(* महास्फोट = Big -Bang
** अवकाश = Space
*** Large Hadron Collider)
No comments:
Post a Comment